📧 support@patsanstha.com | 📞 +91 8003604003
🤝

महा-वसुली सहकार मॅनेजमेंट

सहकारी संस्था व वसुली व्यवस्थापनासाठी आधुनिक डिजिटल प्रणाली

⚖️ अधिकृत सहकार व्यवस्थापन प्रणाली
📢 महत्त्वाची सूचना: नवीन शासन निर्णय (GR), वसुली प्रक्रिया मार्गदर्शक तत्वे व कलम १०१ / १५६ संदर्भातील अद्ययावत माहिती आता उपलब्ध आहे.
🚨

१५६ जप्ती व सक्तीची वसुली प्रणाली

Recovery Management System - Part II

🚨 १५६ जप्ती व सक्तीची वसुली प्रणाली
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०१ अन्वये मिळालेले व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चा नियम १०७ (३) अन्वये वसूलीचे प्रमाणपत्र किंवा कलम ९१ अन्वये मा. ना. सहकार न्यायालय यांनी जमीन महसुलाची थकबाकी समजून, सक्तीच्या मार्गाने वसूलीचा दिलेला निवडा आणि ९८ (ब) अन्वये डिक्रीचा आदेश प्राप्त झालेल्या वसूलीच्या दाखल्यानंतर मान्यताप्राप्त वसूली अधिकाऱ्यांच्यामार्फत करावयाची कारवाई म्हणजे १५६ ची वसूलीची कारवाई.
🎯
रिकव्हरी मॅनेजमेंट सिस्टीम भाग – II म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त वसूली अधिकाऱ्यांच्या कामामध्ये सुसूत्रता, गतीशीलता व पारदर्शकता आणण्यासाठी तयार केलेली अत्याधुनिक संगणक प्रणाली आहे.
✅ या प्रणालीचे फायदे
📊
थकबाकी अथवा वसूल रकमेची माहिती संकलित होऊन सहजरीत्या उपलब्ध होईल.
💰
एकूण आलेला वसूल, त्यावर लागणारा सरचार्ज व वसूलीच्या कामाचा मोबदला यांचा हिशेब ठेवणे सहज शक्य.
📄
सुबक व बिनचूक नोटिस, आदेश, पत्रं, प्रस्ताव आणि वृत्तपत्र जाहिराती तयार करता येतील.
वसूली अधिकाऱ्यांचे लिखाणकाम संपूर्ण कमी होऊन वसूलीच्या कामाकडे लक्ष देणे शक्य होईल.
🔄
एकच माहिती अनेकवेळा प्रत्येक नोटिस मध्ये लिहिण्याच्या कंटाळवाण्या कामातून मुक्तता.
📑 या प्रणालीतून निघणाऱ्या नोटीस आणि आदेश
📦 जंगम व स्थावर मालमत्ता जप्ती
जप्ती पूर्वीची मागणी नोटिस (सुनावणी -१) व शेवटची नोटीस
जंगम मालमत्ता जप्ती आदेश व पंचनामा
जप्त जंगम माल लिलावापुर्वीची व जाहीर लिलावाची नोटिस
जप्त जंगम माल विक्री कायम केल्याचा आदेश
💰 पगार व बँक खाते जप्ती
पगारची माहिती मिळणेबाबत पत्र व स्मरणपत्र
पगार जप्ती आदेश व स्मरणपत्र
बँक अकाऊंट सील आदेश
🏢 स्थावर मालमत्ता जप्ती व लिलाव
स्थावर जप्तीचा पंचनामा व तलाठी/ग्रामसेवक पत्र
स्थावर मालमत्ता जप्ती हुकूम व पेपर जाहिरात
स्थावर मिळकत विक्रीचा जाहीरनामा (लिलाव) व खर्डा
अटी व शर्ती आणि पंचनामा
⚖️ मूल्यांकन व 'र' दाखला (१००-८५)
मूल्यांकन मागणी व अपसेट प्राइस ठरविणे
अपसेट सुनावणी निबंधक यांचे मार्फत
'र' मिळणे बाबत प्रस्ताव, सुनावणी व दाखला
वन टाइम सेटलमेंट (OTS) चे कॅलक्युलेशन
📊 नियोजन व नियंत्रणाकरिता रिपोर्ट्स
वसुली अधिकाऱ्यांसाठी
  • आज देण्याच्या नोटिस
  • 'र' समरी
  • बंद खाती
  • सरचार्ज कॅलक्युलेशन
  • १५६ वसूल तपशील
संचालक मंडळासाठी
  • वसूलीचे लेजर
  • दिनांकानुसार वसुली
  • वार्षिक आणि सहामाही रिपोर्ट